प्रकल्पाविषयक मनातील तळमळ :

आज महाराष्ट्रातील वृद्धांची अवस्था बघून मन भरून येते देशात आणि राज्यात वेगाने वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे साधुसंताच्या या मायभूमीत जिथे आई वडिलांना देवता मानणारी ती भोळी भाबडी माणसं आज अशा प्रकारची आपल्याच आई वडिलांना वागणूक देताना बघून मन अस्वस्थ होते.खरच आपण इतके पुढारलेले आहोत का ? आज आपलेच आई वडील आपल्याला जड झाले आहेत. ज्या घराच्या उभारणीची प्रत्येक वीट कष्टाची आणि घामाची असते लहानग्या बाळाला हाताचा पाळणा करून अंगाखांद्यावर खेळवत, शिकवत मोठं करताना त्यांना अक्षरशः रक्ताचे पाणी करावे लागले अशा आईबापांची एवढीच इच्छा असते की आपली मुलं म्हातारपणाचा आपला आधार बनतील, स्वाभिमानाने फक्त दोन वेळेचे जेवण आणि मुलांचे / नातवंडाचे प्रेम पाहीजे असते.प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखासाठी आपले पूर्ण आयुष्य घालवले त्यांच्यासाठी वेळ द्यावा आपल्या कुटुंबातून त्यांना विरंगुळा पाहीजे असेल किंवा कौटुंबिक अडचणी असतील त्र आता विविध प्रकारे ओल्ड येज केअर सेंटर आहेत त्यांच्या इच्छेने तेथे ते आपल्या आयुष्यातील काही वेळ आरामात घालू शकतात पन दोघांच्यात कधीही दुरावा द्वेष येऊ देऊ नये हेच माझे सांगणे.

संस्थापक / अध्यक्ष
मा. वर्षाजी वाघमारे


सौख्य

सौख्य ही एकच अशी चीज आहे जी जगात दान केल्याने मिळते


दान

दान करता शुध्द चित्ती | अंती तो वैकुंठ प्राप्ती || तेथे एक शीत दिधल्या अन्न | कोटी कुळाचे उद्धारण ||         

वृद्धाश्रम

आयुष्याच्या शेवटच्या वळणावरील आपलं हक्काचं घर.. जिथं फक्त माणुसकी पलीकडच नातं जपणारी माणसं !!     

श्रध्दा आणि संस्कार

दान लाखांचे असो की एक रुपयांचे ! आपली श्रध्दा आणि संस्कारामुळे आत्मिक सुख मात्र लाख मोलाचे असते.

कदर

ह्या जगात आई बाप सोडले तर आपली कदर कोणालाच नसते, मरे पर्यंत विसरू नका.                                        

गरज

आई-वडिलांची जेवढी गरज आपल्याला आपल्या लहानपणी असते ना ! तेवढीच गरज आपली त्यांना म्हातारपणी असते.

यश

आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे ..... आपल्यामुळे आई-वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान.

सुविधा आणि सेवा

01

वार्षिक सण साजरे करणे

02

वाढदिवस साजरे करणे

03

भोजनालय

04

करमणूक

05

विरंगुळा

06

कुटिया

07

वैद्यकीय तपासणी

08

योगासन

09

प्रार्थना ग्रह

10

गार्डन

11

पुरुष हॉल

12

महिला हॉल

संस्थापक

मा. सौ. वर्षा वाघमारे

संस्थापक/अध्यक्षा

मा. श्री. नवनाथजी जगताप

धर्मादाय उपायुक्त पुणे

मा.शंकरराव चौधरी.

संस्था – सेक्रेटरी.